Breaking News

महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्गात अल्प प्रतिसाद


सिंधुदुर्ग, दि. 04, जानेवारी - भीमा कोरेगाव या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.जिल्ह्यातील बससेवा दिवसभर सुरळीत सुरु होती. शाळा, महाविद्यालयेसुद्धा सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बंदचा जिल्ह्यात फारसा परिणाम झाला नसल्याच चित्र दिसून आल.