पुण्यातील महिलेच्या वीजेच्या धक्क्याने मृत्यूची चौकशी करा - नीलम गो-हे
पुणे, - कात्रज परिसरात 2 जानेवारीला एका महिलेचा वीजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही क रण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे. नीलम गो-हे म्हणाल्या 2 जानेवारी रोजी पुण्यातील कात्रज परिसरात एक कष्टकरी व सर्वसाधारण कुटुंबातील महिला सायंकाळी घरी परतत असताना तिला नैसर्गिक विधीकरिता गेली असता तिथे असलेल्या विजेच्या उघड्या तारेच्या संपर्कात आल्याने ती जागेवरच मरण पावल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत क्लेशकारक व दुःखदायक घटना असल्याचे सांगून पुण्यासारख्या शहरातही नागरिकांना वीज जोडणी करताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे व्यक्त केली आहे’.
