Breaking News

रॉयल एनफिल्डचं हिमालयन स्लीट मॉडेल लॉंच.


रॉयल एनफिल्डनं हिमालयनचे स्लीट मॉडेल नुकतेच भारतात लाँच करण्यात आले आहे. या नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन स्लीट बाईकची चेन्नईमध्ये ऑन रोड किंमत 2 लाख 12 हजार 666 रुपये इतकी आहे. रॉयल एनफिल्डचं हे नवीन मॉडेल मर्यादित प्रमाणातच बाजारात उपलब्ध आहे. या मॉडेलचे केवळ 500 युनिट्स तयार करण्यात येणार असून ती फक्त ऑनलाईन बुकिंगवर उपलब्ध असेल. तुम्ही 5000 रुपये टोकन अमाऊंट देऊन या बाईकचं बुकिंग करू शकता.हिमालयन स्लीटची बुकिंग 12 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंतच करता येणार आहे. बुकिंग करण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे. 30 जानेवारीला हिमालयन स्लीटची थेट विक्री होणार आहे. त्यामुळे आधी ही गाडी विकत घेईल त्याला कंपनीकडून ऑफर असेल.