‘छात्र भारती’च्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
मुंबई : मुंबईत गुरूवारी छात्र भारती विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छात्र संमेलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे. या कार्यक्रमात गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांची भाषणे होणार होती. मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात हा कार्यक्रम होणार होता. आम्ही आधीच कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम रद्द करु शकत नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी पोलिसांबरोबर हुज्जत घातली. हा कार्यक्रम होऊ नये म्हणून पोलिसांनी भाईदास सभागृहाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांनी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना सभागृहात जाण्यास मज्जाव केला. पोलिसांनी सभागृहात जाण्यास बंदी घातल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सभाग ृहाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये कोंबले.