Breaking News

विश्‍वासार्हता टिकवण्यासाठी लोकशाहीत पत्रकाराची जागल्याची भूमिका - प्रतिभा पाटील

पुणे, दि. 27, जानेवारी - लोकशाहीत विश्‍वासार्हता टिकविण्यात पत्रकार जागल्याची भुमिका निभावत असतो. नागरिकांच्या मन, बुद्धिचे भरपोषण पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतात. मात्र, सद्यस्थितीत पत्रकारितेचे बदलते आयाम चिंताजनक असल्याचे मत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे दिवंगत स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड.रावसाहेब शिंदे यांचा स्मृतीदिनानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी नेते भाई वैद्य, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शशिकला रावसाहेब शिंदे उपस्थित होते. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ कमल किशोर कदम यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.