Breaking News

नागपूर : उच्च व सत्र न्यायालयात ध्वजारोहण

नागपूर : भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त उच्च न्यायालय परिसरात प्रशासकीय प्रबंधक एम. एस. शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या बरोबरच जिल्हा व सत्र न्यायालयात आज प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही.डी. डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उच्च न्यायालयात न्यायीक प्रबंधक वाय. के. यावलकर, सरकारी वकील सुमंत देवपूजारी, सहायक प्रबंधक (राजशिष्टाचार) पी. एस. जिकार यांच्यासह उच्च न्यायालयातील सर्व प्रबंधक, वकील संघाचे सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश श्री.व्ही.पी. गायकवाड, श्रीमती व्ही.बी. इंगळे, श्री.ओ.पी जयस्वाल, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबा भांडारकर, जिल्हा व न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद फेद्देवार व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.