Breaking News

पारनेर शहरात पोलीसांची दंगा काबूची रंगीत तालीम

पारनेर/प्रतिनिधी / शहरामध्ये बुधवारी दि.10 रोजी सकाळी 11 वाजता पारनेर पोलीस स्टेशन अंतर्गत मॉक ड्रिल प्रात्यक्षिक सह संचलन हनुमान मंदीर ते बसस्थानक परिसरात राबविण्यात आले. याबाबत चे सविस्तर माहिती अशी की ,शहरामध्ये नागरिक आपापल्या कामात व्यस्त असताना सकाळी 11 वाजता अचानक पारनेर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस हनुमान मंदिराजवळ जमा झाले. अचानक पोलीस दिसल्याने नागरिकांना नेमक शहरात काय प्रकरण झालय ? याचा काही अंदाज येईना. 

काही नागरिकांना वाटले की भिमा कोरेगांव दंगलीचे काही पडसाद शहरात उमटले की काय ? तर काही नागरिकांना वाटले बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर कार्यवाही होते की काय,? एक ना अनेक चर्चा शहरात चालु होत्या. काही काळ चौकातील नागरिकांत घबराटीचे वातावरण तयार झाले होते. पोलीस पथकाच्या वतीने हनुमान मंदिरा पासुन ते बसस्थानक पर्यंत संचलन करण्या़त आले. बसस्थानकांवर आल्यानंतर पारनेर पोलीस स्टेशनचे पो.नि.हनुमंत गाडे यांनी सर्व पोलीसांना मॉक ड्रिलची माहीती दिली. शहरात जर अचानक एखादी जातीय दंगल उसळली तर पोलीसांकडुन या दंगलीवर लवकरात लवकर काबु कसा करता येईल.तसेच किती तत्परतेने काम करता येईल. याचे सर्व मार्गदर्शन वरिष्ठांमार्फत करण्यात आले.या सर्व प्रकाराने बसस्थानकांवर संचारबंदी लागु होती की काय ? असे प्रथमदर्शनी वाटत होते. मॉक ड्रिल राबविण्यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पो.नि.हनुमंत गाडे,पो.उप.नि.संजय मातोंडकर,पो.उप.नि.घुगे तसेच पारनेर पोलीस स्टेशनचे 21 कर्मचारी व सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी ,15 होमगार्ड्स ,पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी यांनी मॉक ड्रिल मध्ये सहभाग घेतला होता