Breaking News

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली

ठाणे, दि. 27, जानेवारी - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेनाप्रणित भारतीय विद्यार्थी सेना, युवासेना व जनहित फाऊंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनाप्रमुखांना अभिनव पद्धतीने आदरांजली वाहण्यासाठी ठाणे महापालिका शाळांमधील 700 विद्यार्थ्यांना सोबत घेवून दि ग्रेट एस्केप वॉटर पार्क, पारोळ, विरार येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संघटक, जनहित फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल पाटील व शाखाप्रमुख संतोष भोईर यांनी केले होते. सदर उपक्रमाचे यंदाचे 11वे वर्ष असून ठाणे महापालिका शाळांतील शाळा क्र.60 व 112 बाळकुम, शाळा क्र. 61 ढोकाळी, शाळा क्र. 43 , माजिवडा, शाळा क्र. 59 पानखंडा, शाळा क्र. 101 टकारडा,बाळकुम माध्यमिक शाळा क्र.4 , आदी शाळांतील सुमारे 700 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सुनिल पाटील यांनी बहूमोल सहकार्य करणा-या दि ग्रेट एस्केप वॉटर पार्कच्या उपाध्यक्षा रुबी परेरा यांचे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त क रुन आभार मानले.


सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख संयोजक सुनिल पाटील यांनी कार्यक्रमाची संकल्पना व उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे वॉटर पार्क केवळ टी.व्ही. अथवा जाहिरातीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एक दिवस आनंदाचा मिळावा, त्यांच्या चेह-यावर हसू उमटावे म्हणून महापालिका शाळांतील गरीब विद्यार्थ्यांसाठी ही अनोखी सफर आयोजित करुन शिवसेनाप्रमुखांना आगळी-वेगळी श्रद्धांजली वाहिली असल्याचे सांगितले. दि ग्रेट एस्केप वॉटर पार्क येथे शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वा हिल्यानंतर महापालिका शाळांतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देवून गौरविण्यांत येणार असून त्याचबरोबर सहभागी सर्वच 700 विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्य व खाऊंचे वाटप करण्यांत आले. त्यावेळी सदरच्या उपक्रमांबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. सुमित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘ यशस्वी होण्याचे तंत्र व कानमंत्र ‘ या विषयावर मार्मिक प्रबोधनपर मार्गदर्शन केले.