Breaking News

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या शेतकरर्‍याची प्रकृती गंभीर

मुंबई : मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. धर्मा पाटील हे 84 वर्षीय असून ते धुळे जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील रहिवाशी आहेत. औष्णिक प्रकल्पासाठी संपादित झालेल्या जमिनीला अतिशय अल्प मोबदला मिळाल्याने त्यांनी मंत्रालय परिसरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी फक्त पाटील यांची भेट घेतली. पाटील यांची प्रकृती गंभीर असूनही कोणीही त्यांची साधी विचारपूस केसली नाही, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.