Breaking News

जिल्ह्यात 5 हजार कच्चे बंधारे बांधून पूर्ण

सिंधुदुर्गनगरी, दि. 22, जानेवारी - लोकसहभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयात आतापर्यंत तब्बल 5 हजार 93 वनराई व कच्चे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. बंधारे बांधण्यात सावंतवाडी तालुक्याने आघाडी घेतली असून सर्वाधिक 857 बंधारे बांधून उद्दिष्टाच्या 85.70 टक्के काम पूर्ण केले आहे.


पाण्याचा संचय होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी खाली न जाता ती टिकून राहावी आणि पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी यावर्षी सात हजार वनराई व कच्चे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. पैकी 5 हजार 93 बंधारे आतापर्यंत झाले असून जिल्हयाचे 72.76 टक्के काम पूर्ण झाले आहे.
जिल्हा परिषदेला एकूण 6 हजार 200 बंधार्‍यांचे उद्दिष्ट असून पैकी चार हजार 559 बंधारे पूर्ण (73.53 टक्के) झाले आहेत. कणकवली तालुक्याला एक हजार बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. 649 बंधारे बांधून 64.90 टक्के, कुडाळ तालुक्याला एक हजारचे उद्दिष्ट होते. पैकी 789 बंधारे बांधून 78.90 टक्के, दोडामार्ग तालुक्याला 400 बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 242 बंधारे बांधून 60.50 टक्के, वेंगुर्ले तालुक्याला 500 बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 336 बंधारे बांधून 67.20 टक्के, मालवण तालुक्याला एक हजार बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 811 बंधारे बांधून 81.10 टक्के, देवगड तालुक्याला 900 बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 557 बंधारे बांधून 61.89 टक्के, सावंतवाडी तालुक्याला एक हजार बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 857 बंधारे बांधून 85.70 टक्के, वैभववाडी तालुक्याला 400 बंधार्‍यांचे उद्दिष्ट होते. पैकी 318 बंधारे बांधून 79.50 टक्के काम पूर्ण झाले आहे.