Breaking News

चोरीला गेलेला 29 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला परत !


ठाणे, - चोरीला गेलेला सुमारे 29 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल ठाणे पोलिसांनी तक्रारदारांना परत केल्याची माहिती मिळत आहे. ’रेझिंग डे’ सप्ताह या कार्यक्रमांतर्गत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या हस्ते तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्यानंतर अनेक तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला आहे. ठाणे पोलिसांकडून दरवर्षी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत कायदेशीर प्रक्रीयेअंती तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत केला जातो. गेल्या वर्षात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 3 हजार 233 चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 820 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते.