Breaking News

जळगाव शहरातील स्वच्छ वार्डाला 15 लाखांचे बक्षीस - महापौर


जळगाव, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत शहरातील स्वच्छ वार्ड स्पर्धा होणार असून पहिले बक्षीस 15 लाख, द्वितीय 10 लाख, तृतीय 5 लाख याप्रमाणे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर ललित कोल्हे यांनी दिली.नागरिकांचे सहकार्याने अथवा श्रमदानाने स्वच्छता मोहीम, उद्यान, खुले भूखंड परिसरात राबवावी, ओला व सुका कचरा 100 टक्के वेगवेगळे करावा, प्लास्टीकमुक्त प्रभाग, कचराकुं डीमुक्त प्रभाग, उद्यानाची स्वच्छता व विकास, स्वच्छता व सुशोभिकरण, चौक सुशोभिकरण, कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभागात नियोजन, रस्त्यावर वेस्ट मटेरियल नसावे, स्वच्छतेसाठी प्रभागात रॅली जनजागृती आदी उपक्रम राबविणे निकष तपासले जातील,स्पर्धेत विजयी झालेल्या वार्डातील संबंधित नगरसेवकाच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी वरील रक्कम प्रदान केली जाणार आहे. नगरसेवकांना प्रभागातील प्राथमिक सुविधांवर लक्ष देता यावे, त्यात नागरिकांचाही सहभाग वाढावा यासाठी स्वत:चा प्रभाग स्वच्छ व सुंदर रहावा म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.