Breaking News

नाशिक शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सारडा सर्कल ते दत्तमंदिर उड्डाणपुलाचा प्रस्ताव

नाशिक, दि. 09, डिसेंबर - नाशिक शहरातील व्दारका चौकात निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मात्र आता व्दारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सारडा सर्कल ते दत्तमंदिरदरम्यान उडडाणपुल बांधण्याचा प्रस्ताव तांत्रिक सल्लागार कंपनीने तयार केला आहे. यासोबतच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कराव्या लागणा-या विविध उपाययोजनांचे सादरीकरण आज करण्यात आले. 


सदरचा प्रस्ताव लवकरच राज्यशासनामार्फत केंद्राकडे पाठवला जाणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. हा उड्डाणपुल मंजूर झाल्यास नाशिक शहरातील हा दूसरा मोठा उड्डाणपुल असणार आहे.


गेल्या तीन वर्षांपासून व्दारका ते दत्तमंदिर या मार्गावर चारपदरी उडडाणपूल व्हावा याकरीता केंद्रिय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास मंजूरी देत गडकरी यांनी सदरच्या उडडाणपूलासाठी तांत्रिक सल्लागार कंपनीची निवड करण्यास मंजूरी दिली.