प्रेमासाठी काहीही... पत्नीसाठी डोंगरावर बनवल्या ६ हजार पायऱ्या
तिच्या मुलांचीही तो काळजी घेत असे. लियू जूपेक्षा दहा वर्षांनी लहान होता. त्यांचे हे नाते गावकऱ्यांना मात्र खटकत होते. त्यांनी एकत्र राहण्याला गावकऱ्यांचा आक्षेप होता. गावकऱ्यांनी एखाद्या विधवेने अशा प्रकार घर चालवावे हे मान्य नव्हते. लोकांमध्ये या दोघांबद्दल उलटसुलट बोलले जाऊ लागल्याने त्यांनी या सगळ्यांपासून कुठेतरी दूर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका डोंगरावरील गुहेलाच आपले घरकुल बनविले. तिथे भलेही कुठल्या प्रकारची सुविधा नव्हती तरी प्रेम भरपूर होते. गंमत म्हणजे जूच्या पहिल्या पतीचा मृत्यू होण्याच्या आधीपासूनच लियूला ती आवडत होती.
एवढा खडतर डोंगर चढण्यास जूला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यावर यावर काहीतरी उपया करण्याचे लियूने ठरविले. त्याने हळूहळू डोंगरावर पायऱ्या बनविण्यास सुरवात केली. २००७मद्ये लियूचा मृत्यू झाला, पण जोपर्यंत तो जिवंत होता, तोवर पत्नीसाठी पायऱ्या बनवत राहिला. वयाच्या ७२व्या वर्षी लियूने आपल्या पत्नीच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. जूचेही २०१२मध्ये निधन झाले, पण या जोडप्याची प्रेमकहाणी आजही त्या डोंगरावर उपलब्ध आहे. पत्नीसाठी त्याने बनविलेल्या ६ हजार पायऱ्या त्यांच्या प्रेमाची साक्ष देतात.