Breaking News

महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार.

महाराष्ट्राच्या 16 वर्षा खालील मुलींच्या क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील अंबिका कैलास वाटाडे (पाथर्डी) व स्नेहल किशोर थोरात (लोणी) या दोन खेळाडूंची निवड झाल्याबद्दल अहमदनगर क्रिकेट असो. च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतीच या दोन मुलींच्या निवडीची घोषणा केली आहे.


या गुणवंत खेळाडूंचा सत्कार अहमदनगर क्रिकेट असो. चे अध्यक्ष आ.अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी रणजीपटू अनुप संकलेचा, सहसचिव गणेश गोंडाळ, प्रा.माणिक विधाते, सुमतीलाल कोठारी, ज्ञानदेव पांडुळे, कपिल पवार, सिताराम वरखड, शशीकांत निर्‍हाळी, राहुल काळे, सुभाष भागवत, मिनीनाथ गाडीलकर, अजय कविटकर, रोहीत जैन, कांताशेठ अष्टेकर आदि उपस्थित होते.

आ.अरुण जगताप म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रासह महिला विविध खेळात आपली गुणवत्ता सिध्द करीत आहे. मुलींना क्रिकेट खेळासाठी प्रोत्साहन देण्याकरीता अहमदनगर क्रिकेट असो. च्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील यापुर्वी दोन मुली राज्याच्या संघात खेळत होत्या. अता 16 वर्षाखालील वयोगटात वाटाडे व थोरात या दोन मुलींचा समावेश झाला असून, क्रिकेट खेळात ग्रामीण भागातील मुली राज्याच्या संघा पर्यंन्त मजल मारत आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने ही भुषणावह बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अहमदनगर क्रिकेट असो. च्या वतीने लवकरच मुलींच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच युवा खेळाडू, पंच व धावलेखक यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असून, जिल्हा क्रिकेट असो. च्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.