कृषी मूल्य आयोगामध्ये जाणत्या शेतकर्यांना सहभागी करून घेणार - पाशा पटेल
रत्नागिरी, दि. 08, डिसेंबर - राज्यातील जुन्या जाणत्या शेतकरी मंडळींकडे शेतीसंदर्भात माहितीचा खजिना आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेतला जाणार असून त्यांना कृ षीमूल्य काढण्यासंदर्भातील समितीमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दापोलीत दिली.
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या आज झालेल्या बैठकीनंतर पाशा पटेल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य कृषी मूल्य आयोगाची दुसरी बैठक आज दापोलीत झाली. या बैठकीला कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत राज्यात उत्पादित होणा-या सर्व प्रमुख पिकांचा तपशील गोळा करण्यासाठी डाटा ब ँक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीतील डाटा गोळा करण्यासाठी 279 ठिकाणी नवीन गावांची निवड करावयाची आहे.
कुठल्या पिकाचा उत्पादन खर्च किती येतो याचा तपशील गोळा करण्यासाठी या गावांची निवड करण्यात येणार आहे. या संकल्पनेत एक गाव 10 शेतकरी एक अधिकारी असेल. या अधिका-याकडे तो ज्या गावात तपशील गोळा करण्याचे काम करणार आहे, त्या गावातील तसेच परिसरात होणा-या वातावरणातील बदलासंदर्भातील माहिती गोळा करण्याचे कामही सोपविण्यात येणार असून जो अधिकारी चांगले काम करेल त्याला पुरस्कारही देण्यात येणार आहे. कोकणातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीही आज चर्चा करण्यात आली. आंबा, काजू, भात, नारळ या कोक णातील प्रमुख पिकांसाठी उत्पादन खर्च नेमका किती येतो, याचा अभ्यास करण्यासाठी सध्या कोकणामध्ये 13 डाटा कलेक्शन सेंटर्स आहेत.
ही संख्या 30 पर्यंत नेण्यासाठी आज कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी त्याला मान्यता दिली आहे. तपशील गोळा केल्यावर कोकणातील आंबा, काजू, भात यांचा उत्पादन खर्च नेमका किती येतो हे कळेल व त्यानुसार किती किमतीला शेतक-यांना आपला माल विकता यावा याची शिफारस करण्यात येईल, असे सांगून पटेल म्हणाले की, काजू बोंडापासून चांगले आसव तयार होते. ते आरोग्यासाठीही चांगले आहे. त्यावर कोळथरे येथील माधव महाजन यांनी अभ्यास केला असून त्यावरही काही निर्णय घेण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतीपासून उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करून शेतक-यांना अच्छे दिन यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोक णातले प्रश्न पुढे यावेत यासाठी प्रथमच कोकणात ही बैठक घेण्यात आली असून राज्यातील शेतक-यांना चांगले दिवस यावेत यासाठी राज्य कृषी आयोग सर्व शक्ती पणाला लावून काम करणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले.