घटस्फोटित पत्नीलाही उदरनिर्वाह भत्त्याचा हक्क
नवी दिल्ली : न्यायिक प्रक्रियेपासून अलिप्त राहिलेल्या घटस्फोटित पत्नीलासुद्धा उदरनिर्वाह भत्त्याचा हक्क असून तिला यापासून वंचित ठेवले जाऊ नये, असे डोळस निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदविले आहे. पाटणा उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या निर्णयाविरुद्ध पीडित महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे मत मांडले आहे.
