Breaking News

राष्टीय सेवा योजनेचे डोंंगरगणला हिवाळी शिबीर

अहमदनगर ता. प्रतिनिधी : नगर तालुक्यातील डोंगरगन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिराचे उद्घाटन हबप जंगले महाराज शास्त्री यांच्या हस्ते झाले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगण गावचे सरपंच श्री कैलास पठारे हे होते यावेळी बोलताना जंगले शास्त्री म्हणाले की भारतीय संस्कृती जगात आजही श्रेष्ठ आहे .या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संस्कार नैतिक मूल्यांची जपवणूक केली तरच खऱया अर्थाने या शिबिराचा उद्देश सफल होयिल.यावेळी डॉक्टर जयमन वर्गीस यांचे भाषण झाले.

प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी सुरेश मुगुटमल यांनी केले . त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांचे कर्तव्य विषद केले .या कार्यक्रमास संस्थेचे प्राध्यापक विजय संसारे, प्राध्यापक आसावरी जपके ,प्राध्यापक योगेश कुडाळे ,प्राध्यापक सौ अलका दिवाने,अशोक जानराव, प्रवीण शिंदे ,आदिनाथ मते ,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश राजपूत व आभार विजय संसारे यांनी मानले.