Breaking News

विद्याला करायचेय शाहरूखबरोबर काम


विद्या बालनची गणना बॉलिवूडच्या सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींमध्ये केली जाते, याबद्दल काहीच दुमत नाही, परंतु विद्याला अद्याप बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी कुणाही खानबरोबर ऑन स्क्रीन रोमान्स करण्याची संधी मिळालेली नाही, हेदेखील तितकेच खरे. 

खरे तर विद्या शाहरूखची खूप मोठी चाहती आहे, परंतु याकरिता एखादा दमदार चित्रपट मिळायला हवा, असे विद्याचे म्हणणे आहे. विद्या म्हणाली की, सलमान, आमिर वा शाहरूख यापैकी कुणासोबतही काम करण्यास माझी काहीच हरकत नाही, परंतु त्यांच्याबरोबर चित्रपटातील माझी व्यक्तिरेखाही तितकीच दमदार असायला हवी. खासकरून शाहरूखबरोबर मला इजाजतसारख्या नात्यावर आधारित चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा आहे, जी एक प्रकारे मॅच्युअर प्रेमकहाणी आहे.