जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांच्या हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्ह्यात तपासचक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार असलेल्या महिलेस शिताफीने जेरबंद केले. गुन्ह्यातील संशयीत आरोपी रूक्सा उर्फ रूक्साना जुम्मा शहा (सुप्रीम कॉलनी, मच्छीबाजार ) ही गुन्हा झाल्यापासून फरार होती. सदर महिलेच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले होते. महिलेस एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दोन जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेस अटक.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:30
Rating: 5