Breaking News

महापालिका रस्ते बांधणीवर करणार 400 कोटींचा खर्च

पुणे, दि. 13, डिसेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिका रस्ते बांधणीवर 400 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. गेल्या दहा वर्षात केवळ रस्त्यांच्या कामांवर अब्जावधी रुपयांचा खर्च करणा-या पिंपरी - चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षातही रस्त्याच्या कामांनाच प्राधान्य दिले आहे. तत्कालीन सत्ताधा-यांप्रमाणे विद्यमान सत्ताधा-यांनी पुन्हा एकदा रस्त्यांसाठी तब्बल 400 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली आहे. 


त्यासाठी सन 2017-18 च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे 24 प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी 2017 मध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. भाजपची सत्ता येऊन आठ महिने पूर्ण झाले. या आठ महिन्यात स्थायी समिती समोर मोठ्या खर्चाचे प्रस्ताव सादर होत नव्हते. आता ख-या अर्थाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव येण्यास सुरुवात झाली.