पोटनिवडणुकीच्या रिंगणात नारायण राणे उतरणार नाहीत.
मुंबई : सात डिसेंबरला होणार्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात नारायण राणे उतरणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
मात्र या पोटनिवडणूकीत नारायण राणे उतरल्यास त्यांना निवडून येणे शक्य नाही. कारण विधानपरिषदेतील सध्याचे पाठबळ बघता, भाजपला कोणत्याही एका पक्षांचा पाठिंबा हवा अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेने राणे यांची कोंडी करण्यासाठी मोठी रणनिती आखली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक सहज शक्य नाही, याची जाणीव राणे यांना असल्यामुळे राणे या पोटनिवडूकीतून माघार घेतील असे बोलले जात आहे.
नारायण राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची व्युहरचना आखली असल्याचे समजते.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची एका दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्यापेक्षा छउझ ने लढवावी. छउझ ने ही निवडणूक लढवल्यास राणेंच्या पराभवासाठी काँग्रेस आणि शिवसेना सहकार्य करेल.
नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानपरिषदेची एक जागा रिकामी झाली आहे.
नारायण राणे यांना पुन्हा निवडणुकीत विजय मिळवणे चांगलेच कठिण जाणार असे चित्र दिसत आहे. भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145चा आकडा गाठता येत नाही.
तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर एकूण आकडा 146 म्हणजे बहुमतापेक्षा जास्त होतो.
पण नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांची मतं काँग्रेसच्या गोटात जाणार नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रपती निवडणूकीच्या वेळी भाजपला महाराष्ट्र विधानसभेतल्याच काही अदृश्य हातांनी मदत केली होती. त्यामुळे आता राणेंच्या निवडणूकीत कोणाचे अदृश्य हात मदतीला येतात हे बघणं औत्सुक्याचं आहे.
मुख्यमंत्र्यांची भूमिका निर्णायक
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये रिक्त होणार्या विधानपरिषदेच्या 6 जागांपैकी 1 जागेवर राणे यांची भाजप कोट्यातून वर्णी लागेल असे राणेंना आश्वासन देण्यात आणे आहे. त्याआधी राणे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
नारायण राणे यांनी मात्र पोटनिवडणुकीबाबत अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच भूमिका जाहीर करीन, असे राणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची घेतील ती अंतिम भूमिकाही तितकीच महत्वाची ठरणार आहे.
