दखल.... देशात कायद्याचं राज्य आहे, की काय द्यायचं?
आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. या प्रणालीत कायदा करणारे मंडळ, कायद्याची सुरक्षा ठेवणारी यंत्रणा आणि न्याय यंत्रणा अशा स्वतंत्र यंत्रणा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार कारभार चालला पाहिजे. तशी तरतूदही आहे; परंतु कायदा हातात घेऊन स्वत:च न्याय करण्याची घाई अनेक यंत्रणांना झाली आहे. गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याआधारे गुन्ह्यांची उकल करण्याची पोलिसांकडून अपेक्षा असते; परंतु पोलिसच कायदा हातात घ्यायला लागले आहेत. सांगलीचं उदाहरण हे आता पुढं आलं असलं, तरी ते प्रातिनिधीक आहे.
मुंबईतील अंडरल्वर्ड स्पर्धक टोळीकडून मिळणार्या टीप्सच्या आधारे गुंडाचा खात्मा करणारे पोलिस अधिकारीही कायदाच हातात घेत होते. गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून गुन्हेगारी उद्ध्वस्त करण्याऐवजी सुपारी घेतल्यासारखं काही पोलिस अधिकार्यांचं वर्तन होतं. मुंबई बाँबस्फोटातील आरोपीला औरंगाबादला नेताना असंच चकमकीत मारून तो पळून गेल्याचा कांगावा करण्यात आला.
दहशतवाद्यांच्या बाबतीतही प्राधान्य कशाला हवं, याचाच विसर पडला आहे. दहशतवाद्यांना पकडून त्यांना न्यायालयासमोर उभं करणं, त्यांच्यावरील आरोप सिद्ध करणं, त्यांना शिक्षा करणं, त्यांच्याकडून अन्य दहशतवाद्यांची माहिती मिळवणं याला प्राधान्य असायला हवं;
परंतु लष्करप्रमुख बिपीन रावत हेच दहशतवाद्यांना यमसदनी धाडणं हे आमचं पहिलं काम असल्याचं सांगत असतील आणि त्यावर कुणीच काही बोलायचं नाही, असं ठरलं असेल, तर त्याला काय म्हणायचं? अशा वेगवेगळ्या प्रकरणातून न्यायालयांचे अधिकार आपण आपल्या हाती घेत असून गुन्हा सिद्ध करण्यापूर्वीच त्याचा निकाल लावीत असू, तर कुठंतरी चुकतं आहे, हे मान्य करायला हवं.
अलीकडच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचीही गळचेपी व्हायला लागली आहे. चित्रपट नाटकांसाठी स्वतंत्र सेन्सार बोर्ड आहे. ते स्वायत्त आहे. त्यानं एखादा चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित करायला परवानगी दिली, तर त्यावर वाद होण्याचं काहीच कारण नाही. अशा बोर्डाच्या काही निर्णयावर विवाद होऊ शकतो. त्यावर न्यायालयात दाद मागण्याचा पर्यायही खुला असतो. सेन्सार बोर्ड ही कधीकधी राज्यकर्त्यांच्या दबावाख़ाली येऊन चित्रपटातील महत्त्त्वाच्या दृश्यांना कात्री लावतात. एका चित्रपटात तर नव्वद ठिकाणी कात्री लावण्यात आली होती. त्यावरून प्रचंड वादही झाला होता. पंजाब हे नाव वगळण्याचा आदेश असाच वादग्रस्त झाला होता. ऐतिहासिक घटनांवर चित्रपट एख़ादी कलाकृती करताना इतिहासाची मोडतोड तर केली जात नाही ना, हे पाहायलं हवं. त्याचबरोबर अशा कलाकृतीत सर्व ऐतिहासिक घटनाच असतील, त्यात काल्पनिक काहीच नसेल, असा आग्रह धरता येणार नाही. शेवटी लेखक, निर्मात्याचं ही काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं; परंतु ते मान्यच करायचं नाही. चित्रपटाचे खेळच होऊ द्यायचे नाहीत.कायदा हातात घ्यायचं, हे चुकीचं आहे. एखादी गोष्ट मान्य नसेल, तर त्यावर वैधानिक मार्गानं दाद मागता येते; परंतु कुणाच्या अस्मिता कशासाठी आणि कधी जाग्या होतील, हे सांगणं अवघड झालं आहे. कायदा हातात घेऊन एखाद्याचा खून करणं आणि कायदा हातात घेऊन कलाकृतींना विरोध करणं यातील मानसिकता एकच आहे. आम्हाला दाखविल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, ही भूमिका जशी अरेरावीची आहे, तशीच एखाद्या स्वायत्त संस्थेनं एखाद्या कलाकृतीला परवानगी दिली असेल, तर ती न पाहता ती प्रदर्शित होऊ देण्यास मंत्रालयानं नकार देणं हे ही चुकीचं आहे. न्यूड आणि सेक्सी दुर्गा या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपट मेळाव्यात दाखवू द्यायला मंत्रालयानं दिलेला नकार यावरून सरकारही स्वत:च निकाल करायला लागलं आहे, याचं द्योतक आहे.
राणी पद्मवती या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद त्यापुढचा आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन कुणीही रोखू शकत नाही, असं वक्तव्य अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं केलं होतं. राजस्थानमधील वितरकांनी या चित्रपटाचं प्रदर्शन करण्याचा निर्णय अगोदरच घेतला होता. खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांनी तर दीपिकाच्या भारतीयत्त्वाबद्दल शंका घेतल्या आहेत. ज्या दीपिकाचे वडील प्रकाश यांनी भारताचं वर्षानुवर्षे बॅडमिंटनमध्ये प्रतिनिधित्त्व केलं होतं, त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीत अशा प्रकारचे आक्षेप घेणं हे एका सडक्या मनोवृत्तीचं प्रतीक आहे. आता तर दीपिकावर हल्ला करण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे. आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू, अशी धमकी करणी सेनेनं दिली आहे राणी पद्मवतीच्या प्रदर्शनाविरोधात 1 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणाही त्यांनी केली. राणी पद्मावतीनीच्या जीवनावर आधारित पद्मवती चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून राजपूतांचा अपमान करण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. राजस्थानातील करणी सेनेनं सुरुवातीपासूच या चित्रपटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण करण्यापासून सेट जाळण्यापयर्ंतच्या अनेक घटना आतापयर्ंत घडल्या आहेत. इतका विरोध होत असतानाही पद्मवती प्रˆदर्शित होणारच. कुणीही ते रोखू शकत नाही, असं वक्तव्य दीपिकानं केलं होतं. त्यामुळं करणी सेनेचा तीळपापड झाला आहे. राजपूत समाजाच्या लोकांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वी थिएटरमध्ये आग लावण्याची आणि तोडफोड तसंच हिंसा भडकवण्याची धमकी दिली आहे. संजय भन्साळींचं शीर कापून आणणार्याला पाच कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा उत्तर पˆदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्यानं केली आहे. चित्रपटात रणवीर सिंहची खिलजी, दीपिका राणी पद्मिनी आणि शाहीद कपूर राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेत आहे. अलाउद्दीन खिलजीचं माहात्म्य चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटात काही चुकीचं असेल, तर त्याला सेन्सार बोर्ड, न्यायालय, सरकार आदी ठिकाणी दाद मागता येईल; परंतु शीर कापण्याची, नाक कापण्याची भाषा आपण कोणत्या युगात वावरतो आहे, या देशात कायदे कानून आहे, की नाही, असा संभ्रम निर्माण करणारी आहे.