दशक्रिया... कलाकृतीचा की जातीव्यवस्थेचा...?
उतरंड, राणी पद्मावती, हलाल, न्यूड आणि आता दशक्रिया अशा धाटणीच्या चिञपटांना विरोध करून आपली दुकानं सजविण्याची फशन सध्या आपल्याकडे चांगलीच रूजली आहे.खरे तर धर्म जात परंपरा या पलिकडे जाऊन कला नावाचा एक प्रांत पुर्वापार आपले अस्तित्व प्रत्येक समाजात वेगळ्या स्थानी जपून आहे. माञ अलिकडच्या काळात बहार आलेल्या सुमार दर्जाच्या विचार शक्तींनी या कला प्रांताला लक्ष्य केल्याचे दिसते. उदाहरणादाखल नमूद कलाकृतीपैकी काही ठिकाणी एखाद दुसरे दृश्य आक्षेप नोंदविण्याइतपत आक्षेपार्ह असू शकते माञ त्याची पार्श्वभूमी न तपासता सर्व कलाकृतीला आव्हान देण्याचे स्तोम माजत आहे.
इतिहासाची चिरफाड करून धादांत खोटे संदर्भ निर्माण करून एखाद्या विशिष्ट समाजाला कमी लेखण्याचा, हिनवण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक कुणी करीत असेल तर ते नक्कीच निषेधार्ह आहे.राणी पद्मावतीच्या संदर्भात सध्या चर्चेत असलेला मुद्दा या ठिकाणी चपखलपणे लागू पडतो. संजय लिला भन्साळींसारख्या कलाप्रातांतील महनीय व्यक्तीमत्वाने तो प्रमाद केल्याचा आक्षेप नोंदविला जातो आहे. या आक्षेपाला काही ऐतिहासिक दाखल्यांचाही संदर्भ जोडला जात आहे.
दशक्रियाच्या कथानकात कुठला एक जातधर्म समुह टार्गेट नाही हा पटकदा लेखक दिग्दर्शकचा खुलासा खोडतांना ब्राम्हण आणि ब्राम्हण्यवाद वेगळे नाही असा युक्तीवाद केला जात आहे. हा युक्तीवादही संयूक्तिक नाही. या ठिकाणी एक गोष्ट नम्रपणे नमूद करावी लागेल की ब्राम्हण समाजात जन्माला आलेला प्रत्येक जण ब्राम्हण्यवादी नाहीत. ब्राम्हण्यवाद ही एक प्रवृत्ती आहे ती प्रत्येक समाजात निपजते याचा अर्थ ब्राम्हण समाजात जन्माला आला म्हणून तो ब्राम्हण्यवादी ठरत नाही. नेमका हाच फरक लक्षात घेतला जात नाही.

याच धर्तीवर आणखी एका कलाकृतीवर जोरदार आक्षेप घेतला जात आहे. दशक्रिया नावाचा हा चिञपट ब्राम्हण समाजाच्या सन्मानाला ठेच पोहचविणारा असल्याचा आक्षेप नोंदवून ब्राम्हण महासंघाने या चिञपटाच्या प्रदर्शनाला तिव्र विरोध केला आहे.या विषयी सर्वच माध्यमांवर चर्चा सुरू आहे.
या चिञपटाचे कथानक किरवंत या ब्राम्हणांच्या पोटजातीवर बेतले आहे. हा खरा कळीचा मुद्दा बनला आहे. या मुद्याच्या निमित्ताने ब्राम्हण समाजाने पुन्हा एकदा हिंदु धर्माची चिलखत अंगावर घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा दावा तद्दन स्वार्थी म्हणावा लागेल. हिंदू धर्माची या मंडळींना एव्हढीच चाड आहे तर यापुर्वी कित्येक चिञपटातून हिंदू धर्माच्या चालीरिती रूढी परंपरा यावर टिकात्मक दृश्य चिञीत झाले आहेत तेंव्हा ही मंडळी बिळात लपून बसलेली दिसली. पीकेसारख्या चिञपटातून तर थेट हिंदू दैवतांवर शिव्यांची लाखोली वाहीली गेली तेंव्हा तोंडात गुळणी धरली. मग आत्ताच कसा धर्माचा उमाळा आला. राणी पद्मावती संदर्भातही त्यांची भुमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्राचे दैवतराजे शिव छञपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या मंडळींच्या जीवनाविषयी खोटे साहित्य प्रसारीत होत असतानाही तोंडातील बोळे निघाले नाहीत.
दशक्रियाच्या कथानकात कुठला एक जातधर्म समुह टार्गेट नाही हा पटकदा लेखक दिग्दर्शकचा खुलासा खोडतांना ब्राम्हण आणि ब्राम्हण्यवाद वेगळे नाही असा युक्तीवाद केला जात आहे. हा युक्तीवादही संयूक्तिक नाही. या ठिकाणी एक गोष्ट नम्रपणे नमूद करावी लागेल की ब्राम्हण समाजात जन्माला आलेला प्रत्येक जण ब्राम्हण्यवादी नाहीत. ब्राम्हण्यवाद ही एक प्रवृत्ती आहे ती प्रत्येक समाजात निपजते याचा अर्थ ब्राम्हण समाजात जन्माला आला म्हणून तो ब्राम्हण्यवादी ठरत नाही. नेमका हाच फरक लक्षात घेतला जात नाही.
ब्राम्हण सहिष्णू आहेत.मवाळ आहेत म्हणून त्यांना कुणीही लक्ष्य करते. इतर समाजाच्या बाबतीत ते घडत नाही असाही एक आक्षेप दशक्रियाच्या निमित्ताने पुढे आला आहे. हा आक्षेप खरा असेल तर त्याची कारणमिमांसा व्हायला हवी. आजवरची जातव्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे निर्माते या व्यवस्थेला कारणीभूत आहेत हे विसरता येणार नाही. इतर समाज आता सुशिक्षित झाला. ज्ञानाने, माहीतीने समृध्द झाला आहे. त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे.
लुबाडणूक करणार्या रूढी परंपरांना विरोध होणेही स्वाभाविक आहे. अशा कलाकृती निर्माण होऊन त्यात भर पडत असेल तर त्याचे स्वागत समाज करणार. खरे ते स्वीकारण्यातच खरे बौध्दीक आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या आहेत हे समाज जागृत आणि समंजस झाल्याचे लक्षण समजायला हवे. समाजाची वैचारिक घुसळून झाल्याशिवाय जातीभेदाचा दशक्रिया संपन्न होणार नाही स्वागत या अभिव्यक्ती स्वातंञ्यांचे स्वागत व्हायला हवे