Breaking News

कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळकेंसह दोन निलंबीत सहअभियंत्यांविरूध्द गुन्हा दाखल


दैनिक लोकमंथन च्या बातम्या तुमच्या Whatsapp गृपवर मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा

मुंबई/विशेष प्रतिनिधी : शहर इलाखा साबां विभागातील बहुचर्चित आमदार निवास गैरव्यवहार प्रकरणी अखेर कुलाबा स्थित कफपरेड पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह याच प्रकरणात निलंबीत असलेल्या दोन सह अभियंत्याविरूध्द गंभीर फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे, आ.चरणभाऊ वाघमारे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविल्याने गेल्या तीन महीन्यापासून आ.वाघमारे आणि दै,लोकमंथन करीत असलेल्या संघर्षाचा पहिला अंक संपला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शहार इलाखासह साबांच्या अन्य विभागातील भ्रष्ट अभियंत्यांचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्तांत असा की,मुंबई साबां प्रादेशिक विभागांतर्गत शहर इलाखा विभागाने मनोरा आमदार निवास इमारतीमध्ये दुरूस्तीची व इतर कामे कामे २०१४ मध्ये प्रस्तावित केले होते.त्याप्रमाणे कामाच्या निविदा मागविण्यात आल्या.सर्व प्रक्रिया पार पाडल्या नंतर काम कराण्याची बांधिलकी शहार इलाखावर होती. तथापी प्रक्रियांना फाटा देऊन तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके,सह अभियंता भुषण फेगडे,के.डी धोंगडे यांनी संगनमत केले.

प्रस्तावित कामे २०१४-१५ मध्ये पुर्ण होणे अपेक्षित असतांना २०१६ पर्यत पुर्ण करण्यात आली नाही.तांञिक कारणास्तव कामे पुर्ण न झाल्याने सदर कामांसाठी असलेला निधी वितरीत करण्याचे कुठलेही अधिकार वर नमुद केलेल्या तत्कालीन अभियंत्यांना नव्हते. तथापी आमदारांच्या अनेक कक्षांत कामे न करता किंबहुना काही ठिकाणी अंदाजपञकात प्रस्तावित नसलेली कामे केल्याचे नमूद करून तो निधी अनाधिकाराने वितरीत केला. त्यासाठी काही बोगस दस्तही निर्माण केले.मोजमाप पुस्तकातील मुळ नोंदीही खाडाखोड करून बदलविण्यात आल्या.या विषयी सबळ पुरावे गोळा करून आ.चरणभाऊ वाघमारे यांनी साबां मंञालय आणि साबां प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्या संदर्भात मागणी केली होती.

दै.लोकमंथननेही आ.चरणभाऊ वाघमारे यांची रास्त भुमिका उचलून धरीत तीन महिने पाठपुरावा केला होता.भ्रष्ट अभियंत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास साबांने टाळाटाळ केल्याने आ.चरणभाऊ वाघमारे यांनी बुधवारी स्वतः कफपरेड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके,सहअभियंता धोंडगे आणि फेगडे यांच्यासह काही कंञाटदारांविरूध्द भादंवि संहिता १८६० मधील कलम ४०९,४२०,४६५,४६८,४७१,तसेच लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम १३(१) (क),(ड)सह १३(२) अन्वये गुन्हा नोंदवून सखोल तपास व्हावा असा अर्ज वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना दिला आहे.(क्रमशः)


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा