Breaking News

बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप

लातूर, दि. 03, ऑक्टोबर - व्यापारी आणि शेतकरी यांच्यात सोयाबीन विक्री-खरेदीवरुन निर्माण झलेल्या तिढ्याने तीन दिवस बाजार समित्यांचे व्यवहार बंद राहिले. याचा निषेध  करीत, शेतक-यांचा घेत लातुरच्या महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलूप घातले. जिल्ह्यातील निष्क्रीय बाजार समित्यांची  संचालक मंडळे बरखास्त करावीत, व्यापा-यांवर गुन्हे दाखल करुन शेतक-यांना फरकाची रक्कम द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.