इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी औरंगाबादेत पहिले सेंट्रल फॅसिलिटी सेंटर
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - इलेक्ट्रॉनिक क्लस्टरच्या देशातील पहिल्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीत होणार आहे. “या क्लस्टरसाठी देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर प्रा. लिमिटेड ही स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्यात आली असून, या केंद्राची एकूण किं मत 28.58 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. यासाठीची 75 टक्के रक्कम केंद्र सरकार, 10 टक्के रक्कम राज्य सरकार आणि 15 टक्के रकमेची उद्योजक गुंतवणूक करणार असून या मुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अनेक विषयांना गति मिळणार आहे.