Breaking News

भिवंडीमध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडले !

ठाणे, दि. 28, ऑक्टोबर - भिवंडीमध्ये एका नवजात स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. अनैतिक संबंधातून हे मूल जन्माला आले असावे किंवा स्त्री जातीचे असल्यामुळे  ते फेकले दिले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. हे स्त्री जातीचे अर्भक भिवंडी पिराणीपाडा हिना बाजारात सापडले असून ते एका दिवसाचे अर्भक आहे.
येथील व्यापारी मोहम्मद युनूस मुमताज अली मनियार यांनी शांतीनगर पोलीस स्थानकात यासंबंधित माहिती दिली. कलम 318 अंतर्गत पोलिसांनी अज्ञात मातेविरोधात  गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच या परिसरात कोणती महिला किंवा तरूणी गर्भवती होती का ? यासंबंधित तपास पोलिसांकडून केला जात आहे.