Breaking News

विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडविण्यावर भर राहील - अनुपम खेर

पुणे, दि. 17, ऑक्टोबर - एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर अनुपम खेर यांनी प्रथमच पुण्यात येऊन एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद  साधत कॅन्टीनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. यावेळी खेर यांनी एफटीआयआयच्या कर्मचार्‍यांची आपुलकीने चौकशी केली. यावेळी बोलताना अनुपम खेर यांनी आपण सक ारात्मक दृष्टीने येथे आलो असून माझ्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे आणि एफटीआयआयचे प्रश्‍न समजावून घेऊन ते सोडवण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान अनुपम  खेर यांचा एफटीआयआयमधील प्रवेश नेहमीपेक्षा वेगळा ठरला. नेहमीच्या टीपीकल,औपचारिक प्रथांना फाटा देत खेर यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत, जेवण घेत त्यांची, क र्मचार्‍यांची चौकशी करत मने जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या अनौपचारिक आणि खेळकर वावरण्याने विद्यार्थी सुखावले. त्यांच्यात उत्साह निमार्ण झाला. मात्र खेर हे आमचे  प्रश्‍न, आमचे मुद्दे सोडवतात का हे पाहावे लागेल अशी सावध प्रतिक्रियाही काही विद्यार्थ्यांनी दिली.