Breaking News

भाजपची एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल

गांधीनगर (गुजरात), दि. 23, ऑक्टोबर - गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडतो आहे. अशातच भाजपला सणसणीत चपराक ठरणारी घटना घडलीय. पाटीदार  समाजाचा नेता हार्दिक पटेलची साथ सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नरेंद्र पटेल यांनी भाजपला पहिल्याच दिवशी घरचा आहेर दिला आहे. नरेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते  असून, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आहेत.
भाजपमध्ये सामील करुन घेण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख  रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते., असा घणाघाती आरोप नरेंद्र पटेल यांनी केला.