Breaking News

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर दिवाळी सेल

मुंबई, दि. 14, ऑक्टोबर - आजपासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर पुन्हा एकदा दिवाळीचा बंपर सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवरचा हा दिवाळीचा पहिलाच सेल आहे. तर अमोझॉनचा पहिला सेल नुकताच 8 तारखेला संपला होता, त्यामुळे अमेझॉन पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी नवा सेल घेऊन आला आहे. हे दोन्ही सेल 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान सुरु असणार आहेत. या दोन्ही सेलमध्ये मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट दिली जाणार आहे. त्यामुळे आधीच्या सेलची तारीख हुकलेल्या ग्राहकांसाठी आता पुन्हा एकदा खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.
फ्लिपकार्टने बिग दिवाली सेलची तारीख जाहीर केली आहे. 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि टीव्हीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.