नांदेडची शिवसेना म्हणजे काँग्रेसची ‘बी टीम’असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका
नांदेड महापालिकेच्या निवडणूकीच्या जाहिर प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून आज सकाळी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि कॉग्रेस या दोन्ही पक्षांनी भाजपवर केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला.
नांदेडात 50 हजार लोक बेघर आहेत मुंबईमध्ये फ्लॅट बांधणार्या चव्हाणांना त्यांचे हाल दिसत नाहीत काय असा सवाल त्यांनी केला. नांदेडला मागे ठेवण्याचे काम अशोक चव्हाणांनी केले आहे.
त्यांनी नांदेड आणि नागपुर अशी तुलना केली दोनही गावे मुख्यमंत्र्यांची आहेत मात्र नांदेडमधील रस्त्यांची अवस्था बघा कशी आहे? नांदेडपेक्षा पाचपट मोठे शहर नागपूर आहे तीस लाखांची लोकसंख्या त्या शहरात आहे तिथले रस्ते जाऊन बघा.असे ते म्हणाले. फक्त भाजपला विरोध करण्यासाठी नांदेडची शिवसेना निवडणूक लढवत असून ती अशोक चव्हाणांची बी टीम असल्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा पुन्हा केला.
भाषेच्या पातळीची चर्चा
काल शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांनी तीव्र शिवराळ शब्दात केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीव मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळयांचे लक्ष होते मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठेहि भाषेची पातळी खाली येवु न देता समर्पक ,संयमी शब्दात दोनही पक्षांच्या मर्मावर बोट ठेवून सध्या तरी बाजी जिंकली असल्याची चर्चा सभेनंतर होती.
सभा उधळण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांची सभा चालु असताना काही युवकांनी गोंधळ केला.ते शिवा संघनेचे कार्यकर्ते होते.
त्या युवकांनी लगेच आवरण्यात आले मात्र या गोधंळामुळे थोडेही विचलीत न होता मुख्यमंत्र्यांनी यांनाही अशोक चव्हाणांनी पाठवले असावे असे म्हणत भाषण पुढे चालु ठेवलें.