जवान चंदू चव्हाणवर कोर्ट मार्शल नव्हे तर शिस्तभंगाची कारवाई - डॉ. सुभाष भामरे
धुळे, दि. 30, ऑक्टोबर - जवान चंदू चव्हाण याच्यावर सैन्यदलाने कोर्ट मार्शलची कारवाई केल्याचे वृत्त पूर्णत: चुकीचे आहे. चंदूवर झालेली कारवाई ही सैन्य दलाची खात्याअंतर्गत शिस्तभंगाची कारवाई आहे, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चंदू चव्हाणने नजरचुकीने पाकिस्तानची हद्द ओलांडताना तीन गंभीर चुका केल्याने त्याच्यावर दोन महिन्यांची शिस्तभंगाची कारवाई केली आहे. यामध्ये चंदू चव्हाणला कोणतीही तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही. चव्हाणची सैन्यातील नोकरी कायम रहाणार असून सैन्यदलाने चंदूला कमीत कमी शिक्षा सुनावली आहे, असेही डॉ. भामरे यांनी सांगितले.