कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - अजित पवार
पुणे, दि. 30, ऑक्टोबर - राज्य सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत केली नाही तर आगामी हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिला.
कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनाही आक्रमक आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र यावे मग बघू अधिवेशन कसे चालते ते, असेही श्री. पवार यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळामुळे डिसेंबरपर्यंत कर्जमाफी होणारच नसल्याचा दावा पवार यांनी केला.