भाजप सरकार विरोधात 7 नोव्हेंबरला काँग्रेसतर्फे अमरावतीत जनआक्रोश मेळावा
अमरावती, दि. 30, ऑक्टोबर - भाजप सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, महिला व विविध क्षेत्रांतील घटकाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही चीड दाखवून देण्यासाठी 7 नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये काँग्रेसतर्फे जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
या तीन वर्षांच्या काळात भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले. शेतमालाला अल्प भाव, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या नावावर फसवणूक, वस्तू व सेवा करामुळे व्यापारी वर्गाचीही नाराजी आहे. यामुळे सर्वच स्तरातून सरकारवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनतेचा हा आक्रोश मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेस उघड करणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.