Breaking News

फटाके गोदामावर जिल्हाधिकार्‍यांचा छापा, पाच लाखांचा साठा जप्त

सांगली, दि. 19, ऑक्टोबर - विनापरवाना व लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणार्‍या तीन गोदामावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी छापा  टाकून पाच लाख रूपयांचा फटाक्यांचा साठा जप्त केला. ही कारवाई मिरज तालुक्यातील हरिपूर, बुधगाव व कवलापूर अशा तीन ठिकाणी करण्यात आली.
विनापरवाना व लोकवस्तीत फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करणार्यांवर काही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे  आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन विजयकुमार काळम- पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
हरिपूर रस्त्यावरील काळीवाट येथे महादेव पाटणे याने त्याच्या स्वतःच्या जागेत मोठ्याप्रमाणात फटाक्यांचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीआधारे विजयकुमार क ाळम- पाटील यांनी संबंधिताचे नाव व पत्ता देऊन कारवाई करण्याचा आदेश एका पथकाला दिला होता. मात्र हे पथक त्याठिकाणी गेले असता गोदाम बंद होते. या पथकाकडील  अधिकार्यांनी महादेव पाटणे याला येण्याचा आदेश दिला. मात्र तो काही आला नाही.
महादेव पाटणे हा बोलावून येत नसल्याने थेट आपणच पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासमवेत त्याठिकाणी गेलो. महादेव पाटणे याच्या गोदामात फटाक्यांचा मोठ्याप्रमाणात  साठा आढळून आला. त्याच्याकडील 40 बॉक्स फटाके जप्त केले असून त्याची किंमत चार लाख रूपये इतकी आहे. याशिवाय महादेव पाटणे याच्याकडे ङ्गटाके विक्रीचा कोणताही  परवाना नसल्याचे सामोरे आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे विजयकुमार काळम- पाटील यांनी सांगितले.
या कारवाईचा एक भाग म्हणून मिरज विभागाचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या नेतृत्वाखाली बुधगाव व कवलापूर येथेही छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी एक लाख रू पयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणीही संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.