मागण्या मान्य होईपर्यंत मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा मराठा महासभेत ठराव
औरंगाबाद, दि. 30, ऑक्टोबर - मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सर्व कार्यक्रम उधळून लावण्याचा निर्णय राज्यस्तरीय मराठा महासभेत घेण्यात आला. आतापर्यंत मराठा समाजाचे विविध राज्यातील विविध प्रमुख शहरात 58 प्रचंड महामोर्चे काढून मराठा समाजाने काय साध्य केले तसेच पुढे काय क रावे याचा विचार या महासभेत होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे या महासभेकडे विशेष लक्ष लागले होते.
आज आयोजित करण्यात आलेल्या मराठा महासभेत महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरूवात झाली. कोपर्डी प्रकरणाचे काय झाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले का, शेतक-यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू झाला का, के. जी. ते पी.जी पर्यंतचे शिक्षण मोफत झाले का आदी मराठा समाजाने उपस्थित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील मराठा मोर्चाच्या संयोजकांची शहरातील राधा कृष्ण मगंल कार्यालयात ही महासभा पार पडली. या महासभेला राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. महासभेत झालेल्या चर्चेत आतापयरत 58 मराठा महामोर्चे वेगवेगळ्या ठिकाणी काढले होते. शेवटचा मोर्चा मुंबई येथे काढण्यात आला. एवढे मोर्चे काढून समाजाच्या पदरात क ाय पडले. शासनाने आतापर्यत वचनपूर्ती केली नाही. त्यामुळे आता पुढे काय करायचे यावर विचार झाला. अनेकांनी आक्रमकपणे सरकारच्या विरोधात विषय मांडला. शेवटी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील कार्यक्रम उधळून लावण्याचा निश्चय करणारा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.