औरंगाबादच्या महापौरपदी सेनेचे घोडेले तर उपमहापौरपदी भाजपचे औताडे
औरंगाबाद, दि. 30, ऑक्टोबर - महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना-भाजपा युतीचे नंदकुमार घोडेले यांनी एमआयएमचे उमेदवार अब्दुल रहमान नाईकवाडी यांचा 52 मतांनी पराभव करून विक्रमी विजय मिळविला. उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे विजय औताडे यांनी एमआयएमच्या संगीता वाघुरे यांचा तितक्याच विक्रमी मताधिक्याने पराभव करून निवडणूक जिंकली. राज्यात ताणलेल्या युतीमधील संबंधाच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेना युतीने हा विक्रमी विजय मिळवल्याने युतीच्या कार्यकर्त्यांनी मनपा परिसरात ढोलताशा, गुलालासह जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दुमदुमवून अभूतपूर्व जल्लोष केला.
मनपाच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात महापौर, उपमहापौर पदासाठी आज सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठी नामांकन दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून त्यांची नावे वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना वेळ देण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांना 77, एमआयएमचे अब्दुल रहेमान नाईकवाडी यांना 25 तर काँग्रेस पक्षाचे अय्युब खान यांना 11 मते पडली. सेनेचे घोडेले यांनी सर्वाधिक 77 मते मिळवित एमआयएमचे नाईकवाडी यांचा 52 मतांनी पराभव केला. यावेळी एकूण 113 जणांनी मतदान केले तर एक सदस्य गैरहजर होता. उपमहापौर पदाचे उमेदवार विजय औताडे यांना 77, एमआयएमच्या संगीता वाघुरे यांना 25, तर अफसरखान यांना 12 मते पडली. उपमहापौर पदासाठी एकूण 114 जणांनी मतदान केले. यापूर्वी 2010 ते 2012 या काळात घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले महापौर होत्या. पाच वर्षानंतर त्यांचे पती नंदकुमार घोडेले महापौर झाले आहेत. मनपाच्या इतिहासात पती- पत्नी महापौर होण्याचा मान घोडेले दाम्पत्याला मिळाला आहे.