Breaking News

नि:स्वार्थ भावनेने केलेले सामाजिक कार्य समाज व जिल्ह्यासाठी दिशादर्शक

अहमदनगर, दि. 30, ऑक्टोबर - सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला आपल्यााकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. त्यातच जर आपल्या प्रत्येकाच्या गावागावात जर मोफत  आरोग्य शिबिरे झाली तर ती सर्वांना दिशा देणारे ठरतील तसेच नगरमधील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचे कार्य सुरु आहे. आपली नोकरी सांभाळून समाजासाठी काहीतरी  करण्याची जिद्द मनात बाळगुन बोरुडे यांनी आतापर्यंत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून हजारोंना दृष्टी प्राप्त करु दिली आहे. अशा मानवसेनेचे काम करणा-या व्यक्त ीला स्व. आसराबाई लोखंडे स्मरणार्थ पुरस्कार देताना आज मला मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले.
नगर तालुक्यातील वाळकी येथील स्व.आसराबाई लोखंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना समाजरत्न पुरस्कार  माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्कार वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण  समारंभ सदानंद भणगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात स्व.आसराबाई लोखंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी प्रतिष्ठान राबवित  असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. हा पुरस्कार समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जालिंदर बोरुडे यांना प्रदान करण्यात आला असे सांगितले.