Breaking News

’हिरवाई’त रंगला दिवाळीचा आनंद सोहळा

सातारा, दि. 19, ऑक्टोबर - हिरवाई संस्थेच्या माध्यमातून यावर्षीही कातकरी व झोपडपट्ट्यांमधील मुलांनी दिवाळीचा आनंद सोहळा साजरा केला. शालेय साहित्य आणि क पड्यांनी या सोहळ्याने झोपडपट्टयांमधील मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. शशिकला राऊत, हेमा भाटवडेक र, रष्मी भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
रांगोळ्यांनी सजवलेला रस्ता, पांढरा, लाल, निळा, पिवळा, हिरवा, पोपटी अशा रंगाच्या पताका, फुगे व आकाश कंदील हिरवाईत आकर्षकरित्या लावण्यात आले होते.त्यामुळे  हिरवाईची शोभा वाढली होती. या रांगोळ्यांमध्ये पणत्यांचा मंद प्रकाश, फुलझाडांची रोपे आणि फुलांनी बनवलेल्या आकाशकंदिलांची आरास नेत्रदिपक होती. गेल्या 16 वर्षांपासून  सुरु असणारा हा दिवाळसण प्रा. संध्या चौगुले यांच्यावतीने हिरवाई‘ध्ये साजरा झाला. नगरपालिका शाळा नं. 20, उर्दू शाळा, कातकरी व परिसरातील यावेळी 200 हून अधिक  मुला-मुलींनी दिवाळी उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्याबरोबर दिवाळीचा आनंद लुटला.चार वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या संस्कारातील मुले एकमेकांची ओळख
करुन घेत उत्साहाने एकत्रित दिवाळीचा आनंद लुटत होती. त्यांच्यातील स्नेहभाव, मैत्रीची देवघेव यातील सुंदरता वातावरणात दरवळत होती. कातकरी व झोपडपट्ट्यांमधील  मुलांनी, हिरवाई संस्थेच्या परिसरात दिवाळी अनुभवली. दिवाळीचा हा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ओसंडून वहात होता. कातकरी, पारधी, रस्त्यावर का‘ करणारा मजुर वर्ग अशा  200 हून अधिक लोकांसाठी वर्षभर पुरतील एवढे साहित्य जमा झाले. या‘ध्ये सुमारे एक टेम्पो कपडे व साहित्याचा समावेश होता. सुस्थितीतील कपडे, दप्तर, शालेय साहित्य,  बेडसीट, चादर, खेळणी इत्यादी वस्तुंची रेलचेल होती.