Breaking News

फडणवीस बालिश मुख्यमंत्री : शरद पवार

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - कर्जमाफीच्या अंमलबजावणीत झालेल्या घोळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा  निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बालिश मुख्यमंत्री यापूर्वी कधीही पाहिला नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
‘फर्स्टपोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे वक्तव्य केलं. कर्जमाफीमुळे राष्ट्रावादीच्या ताब्यात असलेल्या सहकारी बँकांना फायदा होईल, असा मुख्यमंत्र्यांचा समज असल्याची  टीकाही पवारांनी केली. फडणवीसांना त्यांच्या स्वतःच्या खात्यांवर आणि प्रशासकांवर विश्‍वास आहे. त्यांनी अधिकार्‍यांची एक अशी फळी तयार केली आहे, जी राज्यासाठी नाही, तर  मुख्यमंत्र्यांसाठी काम करते. असा बालिश मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्रात कधीही पाहिला नाही, अशी जहरी टीका पवारांनी केली.