Breaking News

नागपूर पोटनिवडणुकीत भाजपचे संदीप गवई विजयी

नागपूर, दि. 13, ऑक्टोबर - नांदेडमध्ये काँग्रेस विजयी झाली असली तरी नागपुरात मात्र, भाजपने गड राखला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील महापा लिकेच्या प्रभाग 35-अ येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. याठिकाणी भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा चुरशीच्या लढतीत 463  मतांनी पराभव करत हा विजय मिळवला. 
नागपुरातील प्रभाग 35 -अ या मतदारसंघात 11 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.या निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविल्यामुळे केवळ 24.33 टक्के मतदानाची  नोंद झाली होती. मतदान अत्यल्प झाल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागतो, याबद्दल राजकीय वर्तुळात संभ्रम होता. या निवडणुकीत 8 उमेदवार रिंगणात असले, तरीही मुख्य लढत  सत्ताधारी भाजप व काँग्रेसमध्येच होती. राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसच्याच उमेदवाराला समर्थन दिले होते. तर शिवसेनेने उमेदवारच उभा केला नव्हता.
भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत 151 पैकी पक्षाचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेत सत्ता  स्थापनेच्या 2 महिन्यातच प्रभाग 35 (अ) मधील भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुक ीत पंकज थोरात हे सुमारे 3,500 मतांनी पराभूत झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघाचा हा प्रभाग असल्याने या प्रभागाचा निकाल काय लागतो,  याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रभागात फडणवीस यांनी सुरू केलेले प्रकल्प आपण पुढे राबवणार असल्याचे भाजपचे विजयी उमेदवार संदीप गवई यांनी सांगितले.