युवक काँग्रेसच्यावतीने एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक येथे श्रद्धांजली कार्यक्रम
मुंबई, दि. 30, ऑक्टोबर - 29 सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना आज एक महिना झाला. माहीम तालुका मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, कार्यक्रमाचे आयोजक माहीम तालुका युवा अध्यक्ष विनायक भाटकर, जिल्हा निरीक्षक सचिन नारकर, द .म. मु .जिल्हाध्यक्ष रमेश परब आदी उपस्थित होते.