Breaking News

फवारणी करताना विषबाधा शेतकरी कुटुबांला 2 लाखांची शासकीय मदत

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर -  कीटकनाशकांची फवारणी करताना विदर्भात 18 शेतकर्‍यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. या शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे विषबाधा होऊन 18 शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला. तर 546 शेतकरी रुग्णालयात उपचार घेत आहेत.  कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी जहाल कीटकनाशके पिकांवर फवारणी  करत आहेत. मात्र फवारणी करताना शेतकरी योग्य ती काळजी घेत नसल्याने विषबाधा होत आहे.