Breaking News

दिवाळीनिमित्त 22 व 23 ऑक्टोबर रोजी नांदेड-मुंबई-नांदेड विशेष रेल्वेसेवा

नांदेड, दि. 22, ऑक्टोबर - दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाने दिवाळीनिमित्त होत असलेल्या गर्दी पहाता नांदेड-मुंबई-नांदेड अशी विशेष गाडी चालवली  जाणार आहे, अशी माहिती नांदेड येथील रेल्वे कार्यालयाच्या जनसंपर्क अधिका-यांनी दिली आहे.
गाडी संख्या 07058 नांदेड ते मुंबई : ही गाडी नांदेड येथून दिनांक 22.10.2017 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद  मार्गे सी.एस.टी. मुंबई येथे दुस-या दिवशी सकाळी 04.00 वाजता पोहोचेल. गाडी संख्या 07057 मुंबई ते नांदेड : ही गाडी मुंबई येथून दिनांक  23.10.2017 रोजी सायंकाळी 17.00 वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे नांदेड येथे पोहोचेल.
या गाडीस एकूण 18 डब्बे असतील. ज्यात दोन एस. एल. आर. 13 द्वितीय श्रेणी शय्या, एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत आणि दोन तृतीय श्रेणी  वातानुकुलीत डब्बे असतील. या गाडीचे तिकीट बुकिंग सुरु झाले आहे.