Breaking News

मलेरिया कर्मचार्‍यांना 11 महिने पगार नाही

बीड, दि. 18, ऑक्टोबर - मलेरीया विभाग न.प.अंतर्गत असलेल्या कर्मचार्यांचा 11 महिन्याचा पगार थकलेला असून पैशा अभावी कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना  दिवाळीच्या पुर्व संध्येला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळी आली आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतांना मलेरीया  विभागातील कर्मचार्याना पगार मिळालेला नाही. विशेष करून गेल्या आकरा महिन्याचा पगार थकीत असून कर्मचार्यांवर इतरांकडून पैसे घेवून घर चालविण्याची वेळ आली. आपल्या  पगाराच्या मागणीसाठी सदरील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहे. यावेळी वाघमारे, रेंगे, भोले, सानप, इंगळे, साखरवाड, पाटील, वाघमारे, तांगडे, क दम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.