स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मारक क्रांती चौकातील काळा चबुतराच्या जागेवर
औरंगाबाद, दि. 18, सप्टेंबर - क्रांती चौकातील काळा चबुतराच्या जागेवर हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मारक लवकरच उभारले जाणार आहे. रामानंद तीर्थ यांच्या कार्यकर्तृत्वास साजेसे स्मारक म्हणून शहरातील मध्यवर्ती जागेवर त्यांचा पुतळा उभारावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका रेणापूरचे स्वातंत्र्यसैनिक मुर्गाआप्पा काशिनाथआप्पा खुमसे यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीचा इतिहास विविध अभ्यासक्रमांमध्ये क्रमिक पुस्तकांत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेची सुनावणी तत्कालीन न्या. ए. बी. चौधरी व न्या. इंदिरा जैन यांच्यासमोर झाली असताना पुतळा उभारणीसाठी योग्य जागेची पाहणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी दिले होते. या निर्देशांनुसार क्रांतीचौकातील काळा चबुतराजवळ उभारल्या जाणार्या दोनशे फूट उंच ध्वजाच्या बाजूच्या जागेची पाहणी करण्यात आली आणि त्याच जागेवर रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर सांगितले. 203 फुटांचा ध्वज आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा पूर्ण झाल्यास तो मराठवाड्याचे भूषण ठरणार आहे.