Breaking News

मुथूट फायनान्सवर दरोडेखोरांची हर्सुल कारागृहात रवानगी

औरंगाबाद, दि. 18, सप्टेंबर -  जालना रोडवरील दूध डेअरीजवळ पोलिसांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी मुथ्थूट फिनकॉर्पच्या कार्यालयात दरोडा घालण्याचा  प्रयत्न केला होता. त्यातील पाच आरोपींना हैदराबाद येथे अटक करण्यात आली. दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी धूम ठोकली होती.  याप्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी हैदराबाद येथून अटक करून शहरात आणले. शनिवारी न्यायालयात हजर केले असता ओळखपरेडसाठी न्यायालयीन  कोठडी सुनावली. त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोहम्म्द शरीफ अब्दुल कादर कादरी (रा. 127 रोड मालवाणी मालाड, मुंबई), अर्शद  कुतुबोद्दिन खान (रा मुंबई), सैफोद्दीन उर्फ शफी नवाबोद्दिन सय्यद (रा. किराणी माळा, उस्मानाबाद), संतोष दशरथ वीरकर (रामनगर, उस्मानाबाद), मोहम्मद  दस्तगीर मोहम्मद यासीन (रा. चंदनगुडा, हैदराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. 14 मे 2016 मुथ्थूट फिनकॉर्पच्या व्यवस्थापिका रिना रियाजू यांच्यासह दोन  महिला कर्मचार्‍यांनी आपल्या दैनंदिन कामकाजास सुरू केली असता, दोन तीन जण कार्यालयात आले. त्यापैकी पोलिसांच्या वेशात असलेल्या इसमासह दोन जण  व्यवस्थापिका रिना रियाजू यांच्या दालनात गेले. त्यांनी तुम्ही सोने गहाण ठेवताना ग्राहकाकडून कोणकोणती कागदपत्रे घेता अशी विचारणा केली. तसेच आमच्याकडे  तुमच्या फायनान्स कंपनीत चोरीचे सोने असल्याची तक्रार असून तीन संशयित लोकांची माहिती पाहिजे म्हणत कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. रिना या कागदपत्रे  दाखवित असताना कार्यालयात आलेल्या दोन जणांपैकी एकाने सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर कापण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर रियाजू यांनी  आपल्या सहकारी हिमा बाबू यांना केरळी भाषेतून आपल्या कार्यालयात चोर आले असून, अलार्म वाजविण्याची सूचना केली. अलार्मचा आवाज ऐकून नागरिक  मदतीसाठी धावले. त्यावेळी पोलिसांच्या वेषात आलेल्या युवकाने आपल्या जवळीत रिव्हॉल्वर काढून आम्ही पोलिस आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली व  त्याचा फायदा घेत सर्वांनी पळ काढला. कट रचला; आश्रय दिला पळ काढताना दरोडेखोरांनी कार्यालयातील संगणकाचा सीपीयू व इंटरनेटचे डोंगल चोरून नेले  होते.आरोपी तेव्हापासून फरार होते. तसेच यातील आरोपींपैकी एकाने कट रचला व आरोपींना आश्रय दिला. या कारणाने या दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना  हैदराबादहून अटक करण्यात आली.