Breaking News

पाच लाखांची खंडणी मागणा-या चौघा हल्लेखोरांना अवघ्या तासाभरात अटक

सांगली, दि. 18, सप्टेंबर - कुपवाड शहरातील दुकानाच्या मालकी हक्कावरून दुकानमालकास मारहाण करून पाच लाख रूपयांची खंडणी मागणार्या चौघाजणांना  स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने रविवारी अवघ्या तासाभरात अटक केली.  या चौघांविरोधात कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्यात दीपकसिंग स्वामीनाथन सिंग (वय 23), शिवाजी उर्ङ्ग शिवा लक्ष्मण इंडी (वय 20) व सचिन बाबा करचे (वय 22, तिघेही रा. ङ्गौजदार गल्ली,  सांगली) व रोहित बंडू कटारे (वय 23, रा. गणेशनगर, सांगली) या चौघांचा समावेश आहे. ही कारवाई अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजू कदम,  बापूसाहेब चव्हाण, निलेश कदम, सुनिल चौधरी व सुधीर गोरे यांच्या पोलिस पथकाने केली.
याबाबत हणमंत तुकाराम सरगर (रा. खारे मळा, कुपवाड) यांनी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात ङ्गिर्याद दाखल केलेली आहे. हणमंत सरगर व अंकुश  चव्हाण (रा. बामणोली) यांच्यात कुपवाड येथील उपाध्ये विद्यालयासमोरील दुकान गाळ्याच्या मालकीवरून गत सात वर्षापासून वाद सुरू आहे. हा वाद सध्या सांगली  येथील न्यायालयातही प्रलंबित आहे. याच कारणावरून या दोघात वारंवार भांडणे व वाद होत होता.
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हणमंत सरगर दुकान उघडून नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना अज्ञात नऊ ते दहाजणांनी अचानकपणे त्यांच्या  दुकानात प्रवेश केला व त्यांच्याकडे पाच लाख रूपयांची मागणी करीत त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या सर्वांनी हणमंत सरगर यांना मारहाण करतानाच  त्यांच्या खिशातील रोख 35 हजार रूपये व एक भ्रमणध्वनी असा 38 हजार रूपये किंमतीचा ऐवजही लंपास केला. याशिवाय त्यांच्या दुकानातील संगणक, प्रिंटर,  झेरॉक्स, डीटीएच बॉक्स व दूरध्वनी अशा वस्तूंची मोठ्याप्रमाणात नासधूस करून या वस्तू दुकानाबाहेर रस्त्यावर टाकून दिल्या.
अचानक घडलेल्या या प्रकाराने कोणास काहीही समजले नाही. हणमंत सरगर यांनी आरडाओरड करताच शेजारील नागरिक दुकानासमोर मोठ्या संख्येने जमले.  दुकानाबाहेर जमाव जमल्याचे पाहून या हल्लेखोरांनी पलायन केले. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक  शशिकांत बोराटे यांनी संबंधित हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक  गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या सूचनेनुसार अमितकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने या चौघांना अटक केली. या  सर्वांना कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.