Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे अधिकार्‍यांनी राबविली स्वच्छता मोहीम

पनवेल, दि. 18, सप्टेंबर - पनवेल महापालिकेतर्फे सुरु असलेल्या स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत रविवारी (दिनांक 17 सप्टेंबर) महापालिका प्रशासकीय  अधिकार्‍यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे, सहययक आयुक्त श्याम पोशेट्टी, भगवान खाडे, पनवेल  महापालिका अभियंता संजय कटेकर सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे , आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी कर्नाळा सर्कल येथून  स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात करून भाजी मार्केट परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा या मोहिमेसाठी पंधरवडा जाहीर केला आहे. ही मोहीम 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत चालणार आहे. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने कचरा करायचानाही असे ठरवून आपले शहर स्वच्छ व  सुंदर कसे होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे तसेच सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले होते. केवळ आवाहन करून शांत न  बसता स्वतः महापालिका प्रशासन हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले आहे. 24 सप्टेंबर 2017 रोजी पनवेल महानगरपालिका स्वयंसेवी संस्थांना घेऊन  महास्वच्छता अभियान राबविणार आहे.